एडवर्ड स्नोडेन याने अत्यंत गोपनीय माहिती फोडल्याने बराक ओबामांना धक्का बसण्याची शक्यता नसून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणालाही त्यामुळे तडा गेला नसल्याचे अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत सुझान राइस यांनी स्पष्ट केले .
सुझान राइस या राजदूत पदाचा त्याग करून ओबामा यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून सोमवारी पदभार स्वीकारत आहेत.त्यापाश्र्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. स्नोडेन याने फोडलेल्या गोपनीय माहितीचे विपरीत परिणाम कालांतराने होतील, याबाबत आताच मत व्यक्त करणे संयुक्तिक ठरणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्नोडेनप्रकरणामुळे ओबामांना धक्का नाही-राइस
एडवर्ड स्नोडेन याने अत्यंत गोपनीय माहिती फोडल्याने बराक ओबामांना धक्का बसण्याची शक्यता नसून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणालाही त्यामुळे तडा गेला नसल्याचे अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत सुझान राइस यांनी स्पष्ट केले .
First published on: 30-06-2013 at 07:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snowden issue does not shock obama