संसदीय पावसाळी अधिवेशनात काल (७ ऑगस्ट) राज्यसभेत खासदार संजय राऊत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात वार-पटलवार झाले. नरेंद्र मोदींना परदेशात सन्मान मिळतो या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आगपाखड केली. यावरून, संजय राऊतांनी आज प्रसिद्धी माध्यमांसमोर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

संजय राऊतांनी काल राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेशात सन्मान केला जातो. पण तो सन्मान त्यांचा वैयक्तिक नसून महान लोकशाही परंपरा असलेल्या देशातील नेत्याचा तो गौरव असतो, असं राऊत म्हणाले. त्यावर अमित शाहांनी सभागृहातच त्यांना प्रत्युत्तर दिलं. यावरून आज राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

nana patole criticized bjp and the prime minister excel at staying in limelight through events
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ” मोदींना ‘इव्हेंट’ करण्याची सवय जडली”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
chaggan bhujbal
..तर धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या- छगन भुजबळ
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”

“अमित शाहांनी माझ्या तोंडी खोटी वाक्ये टाकली आहेत. खरंतर, त्यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे. मोदींचा परदेशात सन्मान केला जातोय, ही गळाभेट नरेंद्र मोद यांची नसून महान लोकशाही परंपरा असलेल्या देशाच्या नेत्याचा सन्मान असतो, असं मी बोललो. पण अमित शाहांनी नंतर वेगळंच जोडलं. माझ्या तोंडी असं वाक्य असेल तर मी खासदारकी सोडायला तयार आहे. ते आमच्या तोंडी काहीही घालतात आणि स्वतःची टिमकी वाजवतात. महान लोकशाहीवादी देश म्हणून भारताची परंपरा आहे. आणि महान लोकशाही असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गौरव होतो आणि आपण त्या लोकशाही परंपरेला काळिमा फासला आहे”, अशी टीकाही राऊतांनी आज केली.

“आपल्या सोयीने विरोधकांच्या तोंडी वाक्य घालायचे आणि आपले ढोल वाजवायचे. त्यावर मला पॉइंट ऑफ ऑर्डर घ्यायचा होता पण मला घेऊ दिला नाही. माझा आणि नितिश खरगेंचा माईक बंद केला गेला.माझी दीड मिनिटे शिल्लक होती, मला चार मिनिटेच बोलायला दिली. मी बोलण्याच्या ओघात पुण्याच्या कार्यक्रमावर जात होतो, टिळकांचा पुरस्कार मोदींना मिळाला, ती लोकशाही परंपरा मोदींनी राखली पाहिजे, असं मी बोलणार होतो, तेव्हढ्यात उपराष्ट्रपतींनी माझा माईक बंद केला. मला बोलू दिलं नाही. ही लोकशाहीची गळचेपी आहे”, असा घणाघातही संजय राऊतांनी केला.

Story img Loader