२४ वर्षे जुन्या खटल्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोनलाच्या संस्थापक मेधा पाटकर यांना दिल्लीतल्या साकेत न्यायालयाने  पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी दिल्लीचे नायब राज्यपाल व्हि. के. सक्सेना यांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने पाटकर यांना दिले आहेत.

दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मेधा पाटकर आणि व्ही. के. सक्सेना यांच्यात हा वाद मागच्या २४ वर्षांपासून सुरू आहे. २४ मे रोजी मेधा पाटकर यांना साकेत न्यायालयाने दोषी ठरवलं होतं.

Rahul Gandhi
“मोदीजी लिहून घ्या…”, राहुल गांधींचं भर सभागृहात पंतप्रधानांना आव्हान
What Rahul Gandhi Said?
“पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन करताना आपण झुकलात”, राहुल गांधींचा आरोप; ओम बिर्लांचं तिखट उत्तर
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Narendra modi rahul gandhi lok sabha
राहुल गांधींच्या घणाघाती भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींची एका वाक्यात प्रतिक्रिया, विरोधकांकडून ‘वाह, वाह’ म्हणत चिमटा

हे प्रकरण नेमकं काय?

व्ही. के. सक्सेना हे अहमदाबादच्या नॅशन कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीज या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष असताना त्यांनी मेधा पाटकर आणि त्यांच्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या विरोधात एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही संस्था सरदार सरोवराच्या बाजूने होती. ज्यानंतर मेधा पाटकर यांनी सक्सेना यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. तर सक्सेना यांनी यानंतर मेधा पाटकर यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला होता. ज्या प्रकरणाचा निकाल २४ मे रोजी लागला आणि मेधा पाटकर यांना दोषी ठरवण्यात आलं.

न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवलं होतं?

तक्रारदाराच्या प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो याची जाणीव असूनही मेधा पाटकर यांनी जाहीररित्या आरोप केल्याचं स्पष्ट झालं असं साकेत न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच मेधा पाटकर यांची कृती चुकीच्या हेतूने प्रेरित होती असंही म्हटलं आहे. मेधा पाटकर यांनी सक्सेना यांना त्यावेळी देशभक्त नसलेला माणूस आणि पळपुटा असं म्हटलं होतं. तसंच हवाला गैरव्यवहारांमध्ये हात असल्याचाही आरोप केला होता. मेधा पाटकरांनी केलेले आरोप तक्रारदाराचा अपमान करणारे आणि त्याच्याबाबत नकारात्मक मत तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक करण्यात आल्याचं दिसून येतं असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

मेधा पाटकर यांनी आयपीसीच्या कलम ५०० अंतर्गत दंडनीय गुन्हा केला आहे. त्यामुळे त्या दोषी आहेत. त्यांनी जाणूनबूजून तक्रारदाराची बदनामी केली. मेधा पाटकरांनी जे काही आरोप केले ते फक्त तक्रारदाराची बदनामी करण्यासाठीच होते. मेधा पाटकरांच्या कृतींमुळे लोकांच्या नजरेत सक्सेना यांची प्रतिष्ठा आणि त्यांच्या विश्वासार्हतेला खरोखरच मोठे नुकसान झाले आहे असंही न्यायालयाने म्हटलं आहे. या प्रकरणात मेधा पाटकर यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी त्यांना आता पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून अब्रुनुकसानी म्हणून १० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.