सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं निधन झालं आहे. दिल्ली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र लीव्हर सोरायसीस या आजाराने त्यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांची प्रकृतीही खालावली होती. १९७० मध्ये स्वामी अग्निवेश यांनी आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता. १९७७ मध्ये हरियाणाचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. दरम्यान २०११ मध्ये त्यांनी लोकपालसाठी अण्णा हजारे यांच्या आंदोलनातही स्वामी अग्निवेश सहभागी झाले होते. मात्र काही मतभेद झाल्याने ते या आंदोलनातून दूर झाले होते. स्वामी अग्निवेश हे बिग बॉसमध्येही सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. काही वेळापूर्वीच त्यांचं निधन झालं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा