सर्जिकल स्ट्राईक कारवाईचे पुरावे मागितल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देशभरातून टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानमध्ये मात्र त्यांना चांगलेच समर्थन मिळताना दिसत आहे. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कौतुक केले होते. मात्र एक व्हिडिओ जारी करुन त्यांनी भारताने कारवाईचे पुरावे सादर करावे, अशी विनंती मोदी सरकारकडे केली होती. त्यांच्या या भूमिकेनंतर पाकिस्तान प्रसारमाध्यमांनी केजरीवालांचे उदाहरण देत भारताने केलेल्या कारवाई संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच पाकमधील ट्विटर युजर्सनी केजरीवालांची ही मागणी उचलून धरली. परिणामी ट्विटरवर गुरूवारी #PakStandsWithKejriwal असा ट्रेन्ड दिसू लागला.
पाकिस्तानच्या नेटीझन्सनीं केजरीवालांना उचलून धरले असले तरी भारतीय नेटीझन्स मात्र केजरीवालांवर बरसताना दिसत आहे. केजरीवाल पाकिस्तानची वकिली करत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल नेटवर्किंग साइटवर पहायला मिळत आहेत. पाकिस्तानमध्ये इम्रान खान असताना केजरीवालांना तेथील लोक का समर्थन करत आहेl.अशी उपहासात्मक प्रतिक्रिया एका नेटीझम्सने दिली. तर अरविंद केजरीवाल देशविरोधी भूमिका घेऊन पाकिस्तानची वकीली करत असल्याचे एका महिला नेटीझम्सने म्हटले. केजरीवालांची थट्टा करणारे काही बॅनर फलक देखील ट्विटवर शेअर करण्यात आले आहेत.

Story img Loader