आठ दिवसांपासून युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धामध्ये स्वत:ला सुपरपॉवर म्हणवणाऱ्या अमेरिकेला, युरोपीय राष्ट्रसंघाला जमलं नाही ते भारताने करुन दाखवल्याचा दावा केला जातोय. (युद्धाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा) युक्रेन-रशियालगतच्या पूर्व आणि ईशान्य भागात सुमारे चार हजार भारतीय अडकून पडले असून, त्यात बहुतांश वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी बरेच विद्यार्थी हे युक्रेनच्या खार्किव्ह शहरात अडकून पडलेत. याच शहरावर मागील काही दिवसांपासून रशियाकडून सातत्याने हवाई हल्ले होत होते. त्यामुळेच भारतीय विद्यार्थ्यांना तेथून सुरक्षित स्थळी हलवता येत नव्हतं. मात्र काल सायंकाळी ते रात्री उशीरापर्यंत भारतासाठी रशियाने या शहरातील संघर्ष सहा तासांसाठी रोखून धरल्याचा दावा सोशल नेटवर्किंगवरुन केला जातोय. मात्र असं काहीही झालं नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्प,्ट केलंय.

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

खार्किव्हमधील संघर्ष आणि हल्ले थांबवण्यामागे नवी दिल्लीचा मूळ हेतू हा भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याचा होता असं सांगितलं जात आहे.. युक्रेनमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरात अडकून पडलेल्या भारतीयांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी भारताने रशियाकडे सुरक्षित मार्गासाठी विनंती केलेली. दिल्लीमधून सूत्र फिरल्यानंतर दिल्लीच्या शब्दावर मॉस्कोमधून या शहरामधील हल्ले सहा तास थांबवण्यात आले असा दावा केला जातोय. यासाठी आता दिल्लीतून या युद्धविरामासाठी शब्द टाकणाऱ्या मोदी सरकारचं कौतुक होताना दिसतंय.

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”
JP Singh met Afghanistan Interim Defense Minister Maulana Mohammad Yakub in Kabu
तालिबानी राजवटीशी पहिलाच संवाद!

नक्की वाचा >> Ukraine War: रशियन उद्योजकाने दिली पुतिन यांची साडेसात कोटींची सुपारी; म्हणाला, “जिवंत किंवा मृत पकडून…”

रशिया आणि युक्रेन संघर्षामध्ये भारताची भूमिका तटस्थ राहिली आहे. ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,’असं सांगत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे देशाची भूमिका स्पष्ट केली होती. भारताने हा संघर्ष सुरु झाल्यापासून रशियाने केलेल्या हल्ल्याबद्दल फार थेटपणे कोणतही व्यक्त केलेलं नाही. मात्र बुधवारी सायंकाळी पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याशी संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने खार्किव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांबद्दल चर्चा झाली. या फोन कॉलनंतर लगेच खार्किव्हवरील हल्ले रशियाने काही तास बंद केल्याचा दावा सोशल नेटवर्किंगवरुन करण्यात आलाय.

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

बुधवार सायंकाळपासून रात्रीपर्यंत रशियन हवाईदलाने खार्किव्हवर बॉम्ब हल्ला केला नाही. त्यामुळेच दिल्लीला दिलेला शब्द पाळण्यासाठी जगात कोणाचंही न ऐकणाऱ्या रशियाने सहा तास युद्ध रोखून धरल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगलीय. सोशल मीडियावर भारतीय मुत्सद्देगिरीचं कौतुक केलं जात आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न

राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील तज्ज्ञ असणाऱ्या नितीन गोखलेंनी ट्विटरवरुन युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशिया ‘मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग’तयार करण्यात आल्याचं सांगितलं. खार्किव्हमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी काही तासांचा अवधी दिला होता, असं ते म्हणालेत.

रशियन लष्कराला खार्किव्हवर ताबा मिळवण्यासाठी लवकरात लवकर हलचाली करायच्या असल्याने भारताला केवळ सहा तासांचा वेळ देण्यात आला होता असंही गोखले म्हणालेत.

नक्की वाचा >> Ukraine War: “एका व्यक्तीच्या इगोमुळं संपूर्ण जगाला त्रास सहन करावा लागतोय, लोकशाही टिकवणं हे…”

ही मोदींची ताकद आहे.

भारताची ताकद

नक्की वाचा >> Ukraine War: “भारत, पाकिस्तान, चीन सरकारने मॉस्कोवर…”; युक्रेन सरकारनं केलं आवाहन

युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी पुतिन यांच्याशी बोलताना युक्रेनमधील खार्किव्हमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांबद्दल चिंता व्यक्त केलेली. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेबद्दल मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांना माहिती दिल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतरच सूत्र हलली आणि खार्किव्हमधून भारतीयांना बाहेर काढण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान, गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना खार्किव्ह सोडण्यासाठी रशियाने युद्ध सहा तासांसाठी थांबवल्याच्या वृत्ताचे खंडन केले. खार्किवमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त होते. परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्तांचे खंडन करत आमच्या विनंतीवरून युद्ध थांबलेले नाही असे म्हटले आहे. “युद्ध आमच्या सांगण्यावरून थांबेल असे नाही. हे म्हणजे आमच्या सांगण्यावरून पुन्हा बॉम्बफेक सुरू होईल की काय, असे आहे. मी या अहवालांवर भाष्य करू शकत नाही,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.