देशात पुन्हा एकदा नवीन करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. दिल्लीतही क्रॉनच्या तिसऱ्या लाटेने थैमान घातलंय. विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील करोनाची लागण झाली आहे. स्वत: अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला सौम्य लक्षणं जाणवत असून घरात स्वत:ला विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत वेगाने करोनाचा संसर्ग फैलावत असून चिंता वाढली आहे. सोमवारी दिल्लीत करोनाचे ४०९९ रुग्ण आढळले होते.
दिल्लीमध्ये कर्फ्यूची घोषणा केल्यानंतर मात्र सोशल मीडियावर मिम्सचा पूर आला आहे. लोकं या गोष्टीने हैराण आहेत की त्यांना वीकएंडला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. ट्विटरवर सुद्धा #WeekendCurfew #DelhiCovid हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. त्यातच दुसरीकडे काही अशी सुद्धा जे या गंभीर गंभीर परिस्थितीतही मस्करी करत आहेत. सोशल मीडियावर अनेक यूजर्स गमतीशीर मिम्स आणि जोक्स शेअर करत आहेत. तसेच इतर नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.
दिल्लीतील वाढत्या करोना रुग्णांमुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता डीडीएएमची एक बैठकदेखील आयोजित करण्यात आली. या बैठकीत करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.