करिअरचे विविध पर्याय आणि सैन्यदलातील खडतर वातावरण यामुळे सैन्यदलात भरती होणाऱ्या तरुणांचे प्रमाण रोडावत चालले असून सध्या १३ हजार अधिकारी व ५३ हजार ७०० जवानांची कमतरता आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी सोमवारी लोकसभेत दिली.
तरुणांनी सैन्यदलात यावे यासाठी भरती रॅली आणि प्रसारमाध्यमांतून मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. तर विविध सैन्य अॅकॅडमीतून गेल्या दोन वर्षांत ९००१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले.
सैन्यदलातील रिक्त पदे
*लष्कर
जवान – ३२,४३१
अधिकारी – १०१००
* नौदल
खलाशी – १४,३१०
अधिकारी – १९९६
* हवाई दल
वायूसैनिक – ७०००
अधिकारी – ९६२
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in