अल कायदा या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची धमकी दिल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव मध्य आशिया आणि आफ्रिकेतील बंद करण्यात आलेले अमेरिकेचे काही दूतावास रविवारी पुन्हा सुरू करण्यात आले. ४ ऑगस्ट रोजी अल कायदाच्या हल्ल्याची धमकी दिली होती. दरम्यान, रमजानचा पवित्र महिना सुरू असल्यामुळे अनेक दूतावास अजून सुरू करण्यात आलेले नाही. संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबी येथील दूतावास, तसेच दुबई येथील अमेरिकेचा वाणिज्य दूतावास पुन्हा सुरू करण्यात आला आहे. लिबियामधील दूतावासही रविवारी पुन्हा सुरू करण्यात आला.
सौदी अरेबियामध्ये रियाध दूतावास, तसेच जेद्दा आणि दहारन येथील वाणिज्य दूतावास बंद आहेत. कतारमधील दूतावासही बंद आहेत. रमजानचा महिना संपल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी हे दूतावास पुन्हा उघडण्याची शक्यता आहे. बहारीन आणि कुवैतमधील दूतावास पुन्हा उघडण्यात येणार आहेत.
अमेरिकेचे काही दूतावास पुन्हा सुरू
अल कायदा या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची धमकी दिल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव मध्य आशिया आणि आफ्रिकेतील बंद करण्यात आलेले अमेरिकेचे काही दूतावास रविवारी पुन्हा सुरू करण्यात आले.
First published on: 13-08-2013 at 01:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some us embassies resume work