ऑस्ट्रेलियात गेल्या वर्षी सिडनी येथे एका माहिती तंत्रज्ञान कर्मचारी असलेल्या महिलेची हत्या ही भारतातीलच कुणीतरी केली असल्याचे धागेदोरे मिळाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. या महिलेचा खून काहीचा गूढ होता, त्यात किमान २ हजार लोकांचे जाबजबाब झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभा अरुण कुमार या महिलेला माइंड ट्री कंपनीने तीन वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर ऑस्ट्रेलियात पाठवले होते, त्यांचा सिडनी येथे घराच्या जवळच फिरायला गेल्या असताना मार्च महिन्यात खून झाला होता. ‘सिडनी मॉर्निग हेराल्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार या महिलेच्या खून प्रकरणी दोन हजार जणांचे जाबजबाब घेण्यात आले आहेत. चौकशीत अडीचशे जणांचे लेखी जबाब नोंदवले आहेत. वेगवेगळ्या हितसंबंधी लोकांची पोलिसांनी चौकशी केली असून त्यातील माहितीची जुळवाजुळव केली आहे. गेल्या वर्षी परामट्टा येथून रेल्वेतून उतरल्या असता त्यांचा खून कुणी केला, याचा पोलिस तपास करीत आहेत. कुमार यांना ओळखणाऱ्या भारतातील व्यक्तीने त्यांचा खून केला असावा असा पोलिसांचा संशय आहे. या खुनातील व्यक्ती बाहेरची म्हणजे भारतातील आहे, असे गुप्तचर सेवेचे रिची सिम यांनी सांगितले. कुमार यांचा खून करणारी व्यक्ती त्यांच्या परिचयातील नव्हती. त्यांचा खुनी ऑस्ट्रेलियातच आहे की तो येथून निघून गेला, असाही एक प्रश्न आहे. परामट्टा पार्क भागातील प्रत्येक घरातील व्यक्तीशी पोलिसांचे बोलणे झाले आहे. या सगळ्या भागाची किमान चार वेळा तपासणी करण्यात आली आहे.