मुलगा विवाहित महिलेसोबत पळून गेल्याने हताश झालेल्या आई-वडिलांनी आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. कर्नाटकच्या रमानगरा जिल्ह्यात ही दुर्देवी घटना घडली. सिद्दाराजू (५२) आणि एस. साकाम्मा (४५) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी जेव्हा शेजाऱ्यांनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला तेव्हा दोघे पती-पत्नी मृतावस्थेत सापडले.

दोघांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या जोडप्याचा मोठा मुलगा एस.मनू (३२) मागच्या आठवडयात एका २९ वर्षीय विवाहित महिलेसबोबत पळून गेला. मनू ज्या महिलेबरोबर पळून गेला तिच्याबरोबर मनूचे लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते. २०१६ मध्ये तिने दुसऱ्या बरोबर लग्न केले असे कुटुंबियांनी सांगितले. मनूला त्या महिलेला लग्न करायचे होते. पण दोघांची जात वेगळी असल्यामुळे कुटुंबियांचा विरोध होता.

या महिलेच्या कुटुंबियांनी नंतर तिचे दुसऱ्याबरोबर लग्न लावून दिले. लग्नानंतरही मून त्या महिलेला भेटत होता. अखेर मागच्या आठवडयात दोघे पळून गेले. सुरुवातीला कुटुंबियांना एक ते दोन दिवसात दोघे परत येतील असे वाटले होते. महिलेचे नातेवाईक मनूच्या घरी गेले होते व दोघे कुठे पळून गेले ते तुम्हाला माहित आहे का ? असे मनूच्या आई-वडिलांना विचारले.

त्यावर सिद्दाराजू (५२) आणि एस. साकाम्मा यांनी दोघांबद्दल आपल्याला काही कल्पना नसल्याचे सांगितले. पण संतप्त झालेल्या महिलेचे नातेवाईक काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी भरपूर सुनावले. मनूला महिलेसोबत पळून जाण्यासाठी मदत केली असा आरोप केला.

Story img Loader