सासू-सुनेमधील वाद आपण पाहिलेच आहे. पण, आता सुनेच्या कृत्यांमुळे हैराण झालेल्या सासूने पोलिसांत धाव घेतली आहे. सून सर्वांना ‘यार’ म्हणून संबोधते. तसेच, सून गुटखा खाऊन घरात थुंकत असल्याचा आरोप करत सासूने पोलीस आणि कौंटुबिक समुपदेशन केंद्रात तक्रार केली आहे. सासूने समुपदेशन केंद्रात गुटख्याच्या पुड्याही आणल्या होत्या. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ही घटना समोर आली आहे.
“पाच महिन्यांपूर्वी तिच्या मुलाचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर सून सर्वांना ‘यार’ म्हणून संबोधायची. सून सतत गुटखा खाऊन घरात थुंकते. गुटखा खाणे आणि सर्वांना ‘यार’ म्हणण्याची सूनेची सवय सोडवावी,” अशी विनंती सासूने पोलिसांकडे केली आहे.
हेही वाचा : आपल्याच प्रतिस्पर्धी कंपनीत मालक करत होता नोकरी; चार वर्षांत लाखोंचा चुना लावून पसार!
यानंतर पोलीस आणि कौंटुबिंक समुपदेशन केंद्रानं सुनेशी चर्चा केली. तेव्हा सुनेनं आपली चूक मान्य केली आहे. तसेच, मी कोणालाही ‘यार’ म्हणून संबोधणार नसल्याचं सुनेनं पोलिसांना सांगितलं. पण, गुटखा सोडणार सुनेनं नकार दिला आहे.
“कोणत्याही परिस्थितीत गुटखा सोडणार नाही. मात्र, गुटखा खाल्ल्यानंतर घरात कुठेही थुंकणार नाही,” असं स्पष्टपणे सुनेनं पोलिसांना म्हटलं.
हेही वाचा : माणुसकीला काळिमा! शेळ्या चोरल्याच्या संशयावरून दलित व्यक्तीला उलटं टांगलं अन्…, धक्कादायक VIDEO आला समोर!
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कौंटुबिक समुपदेशन केंद्राने पुढील तारखेला सुनावणी ठेवली आहे. सुनेनं गुटखा खाऊ नये, असं सासूचं मत आहे. तर, सुनेनं त्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.