नवी दिल्ली : आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो व त्यांच्या यशासाठी शुभेच्छा, अशा शब्दांत ‘इन्फोसिस’चे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आपले जावई ऋषी सुनक यांच्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया दिली. ४२ वर्षीय सुनक यांनी रविवारी ब्रिटनमधील हुजूर पक्षाच्या नेतृत्वस्पर्धेत बाजी मारली. ते भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मूर्ती यांनी सांगितले, की ऋषी यांचे अभिनंदन. आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. आम्ही त्यांच्या यशासाठी शुभेच्छा देतो. ब्रिटनच्या जनतेसाठी सर्वोत्तम सेवा ते देतील, असा विश्वास आहे. कॅलिफोर्नियातील ‘एमबीए’साठी स्टॅनफोर्ड येथे असताना इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यानंतर २००९ मध्ये सुनक यांनी अक्षतासोबत विवाह केला. या दाम्पत्याला कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत.

Story img Loader