उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या मुलाला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची आणि एक लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
अलिपूर भागातील समाजवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष पतंजली भारद्वाज यांचा मुलगा वरूण भारद्वाज याने २७ डिसेंबर २०१० रोजी एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता. त्या खटल्याचा निकाल देत न्यायालयाने वरूण भारद्वाजला जन्मठेपेची शिक्षा दिली. दंडाच्या रकमेतील ७० हजार रूपये पीडित मुलीला देण्याचा आदेश न्यायालायने आरोपीला दिला.

Story img Loader