Son Set Fire To Mother : उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये एक अत्यंत निर्घुण घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या आईला पोलिस स्टेशनच्या आवारात पेटवून दिले. नातेवाईकांसोबत मालमत्तेच्या वादातून आईला पेटवल्यानंतर त्या घटनेचे चित्रण करण्याचा प्रयत्न तरुणाने केला. हा तरुण आपल्या आईला पेटवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

खैर पोलीस ठाण्याच्या आवारात मंगळवारी ही घटना घडली. नातेवाइकांशी मालमत्तेच्या वादातून महिला आणि तिच्या मुलाने पोलीस ठाणे गाठले. काही वेळाने महिला आणि तिचा मुलगा पोलिस स्टेशनमधून बाहेर पडले आणि आवारात एका निर्जन ठिकाणी गेले. महिलेने अंगभर पेट्रोल ओतले आणि स्वत:ला पेटवून घेण्याची धमकी पोलिसांना देऊ लागली.

In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
बुलढाणा : पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून पेटवले! माजी सैनिक अत्यवस्थ!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Fire , Natasha Enclave Society, Kondhwa,
पुणे : कोंढव्यातील नताशा एनक्लेव्ह सोसायटीत आग, रहिवासी बाहेर पडल्याने बचावले
Massive fire breaks out in Kurla news in marathi
कुर्ल्यातील उपाहारगृहात भीषण आग
thane fake baba marathi news
काळ्या जादूचा नाश करण्यासाठी बाबा आणणार होता मृतदेह, मृतदेह आणण्यासाठी बाबाने घेतले ८ लाख ८७ हजार रुपये
PM Narendra Modi on Godhra Train Burning
“मी जबाबदारी घेतो, हवं तर लिहून देतो, पण…”, पंतप्रधान मोदींचं गोध्रा जळीतकांडावर भाष्य
mumbai fire brigade
मुंबई : अग्निशमन दलाच्या ताफ्यात ६८ मीटर उंच शिडी वाहने दाखल होणार
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”

हेही वाचा >> Groom Dies in Custody : लग्नाच्याच दिवशी चोरीच्या आरोपाखाली नवरदेवाला अटक; तुरुंगात जाताच मृत्यू; कपडे काढून महिलांचंचं आंदोलन!

आईने अंगावर पेट्रोल ओतून घेतलं तर मुलाने लायटरने पेटवले

व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक पोलीस अधिकारी महिलेकडे धावत आला आणि ती स्वत: ला पेटविण्याचा प्रयत्न करत असताना तिचा हात धरला आणि तिचा मुलगा त्याच्या मोबाईल फोनवर संपूर्ण घटना रेकॉर्ड करत आहे. पोलिस अधिकाऱ्याने आईला स्वतःला पेटवून घेण्यापासून रोखल्याचे तरुणाने पाहिल्यावर त्याने लायटरच्या सहाय्याने आईला पेटवून दिले.

आई जिवंत जळत असताना पोरगा रेकॉर्ड करत बसला

त्याची आई जिवंत जळत असताना तरुणाने रेकॉर्डिंग केले आणि आग विझवण्याचा प्रयत्नही केला नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून वेळीच आग आटोक्यात आणून महिलेला वाचवले. आग विझवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या हातालाही जखमा झाल्याचं वृत्त आहे.

तरुणाला अटक

पोलिसांनी सांगितले की, महिला ४० टक्के भाजली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी असेही सांगितले की, प्राथमिक तपासात मुलानेच आईला पेटवून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. आईला पेटवून दिल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

Story img Loader