टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणाने नवीन वळण घेतलंय. सोनाली यांच्या बहिणीने घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर आता त्यांच्या भाच्यानेही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनाली यांच्या भाच्याने त्यांचा लॅपटॉप आणि इतर साहित्य खोलीतून गायब असल्याचं म्हटलंय. तसेच सोनालींच्या हत्येमागे त्यांचा पीए सुधीर सांगवानचा हात असल्याचा आरोपही केलाय. दरम्यान, सोनालीच्या चेहऱ्यावर सूज आणि जखमा आढळल्याचा दावा सोनाली फोगट यांचा पुतण्या मोहिंदर फोगट याने केला आहे. अशातच सोनाली यांच्या शवविच्छेदनाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाला नवं वळण; खोलीतून लॅपटॉप गायब झाल्याचा कुटुंबियांचा आरोप, पोलिसांनी पीएला घेतलं ताब्यात

सोनाली यांचा मृतदेह कालपासून रुग्णालयात आहे. त्यांचे कुटुंबीय गोव्यात आल्यानंतरच शवविच्छेदन केलं जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. परंतु सोनाली फोगट यांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. दोन डॉक्टरांची टीम त्यावर काम करणार आहे. पोलिसांच्या आदेशानुसार या प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे. त्यानंतर सोनालींचा व्हिसेरा गोवा येथे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला जाईल. सोनालींच्या कुटुंबीयांसह पोलीस थोड्या वेळात गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचणार आहेत, अशी माहिती इंडिया टुडेने दिली आहे.

हेही वाचा – सोनाली फोगट यांच्या बहिणीने व्यक्त केला हत्येचा संशय; म्हणाल्या, “जेवणात काही तरी…”

सोनाली फोगट यांनी मृत्यू २३ ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला.  प्राथमिक तपासाअंती सोनाली २२ ऑगस्ट रोजी गोव्यात आल्या होत्या आणि त्या अंजुना येथील हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. हॉटेलमध्ये अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. दरम्यान, आज २४ ऑगस्ट रोजी त्यांचं शवविच्छेदन होणार असून, पोलिसांच्या आदेशानुसार या प्रक्रियेची व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे.