Sonia Doohan : ‘मी सुप्रिया सुळे यांच्यामुळे पक्ष सोडतेय’, असं ठामपणे सांगून शरद पवारांची साथ सोडणाऱ्या सोनिया दुहान यांनी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सोनिया दुहान या शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जात होत्या. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरिस त्यांनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा पक्षांतर्गत मोठी खळबळ माजली होती. सोनिया दुहान राष्ट्रवादीच्या लेडी जेम्स बाँड समजल्या जात होत्या.

२०२३ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा मागे घेताना शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोनिया दुहान त्यांच्या मागेच बस्या होत्या. तेव्हापासून सोनिया दुहान (Sonia Doohan) नाव चर्चेत आलं. अजित पवारांच्या सकाळच्या शपथविधीलाही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असं म्हटलं जातंय. राष्ट्रवादीत असताना त्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्या मूळच्या हरियाणामधील हिसारच्या रहिवासी असून तिथंच शालेय शिक्षण झालंय. आता त्यांनी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेता भुपिंदर शुदा, हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदयभान चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यासंदर्भात त्यांनीच एक्सवरून माहिती दिली.

BJP workers waited four hours for Priyanka Gandhis road show
नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Assembly Election 2024 Waiting for four hours to see Priyanka Gandhi By the citizens of Nagpur news
प्रियंका गांधींना फक्त बघता यावे यासाठी तब्बल चार तासाची प्रतीक्षा
Nitin Gadkari Kothrud , Chandrakant Patil,
विकासासाठी महायुतीची गरज, नितीन गडकरी यांचे आवाहन
Ajit Pawar: ‘विलासराव देशमुख आघाडीचे सरकार चालविण्यात पटाईत’, अजित पवारांचे सूचक विधान; महायुतीला इशारा?
rahul gandhi rally in gondia maha vikas aghadi
Gondia Assembly Election 2024 : गोंदियातील राहुल गांधींची सभा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तारणार?
Aruna Sabane asked harassed Priya Phuke is not beloved BJP sister
प्रिया फुके ही सरकारची ‘लाडकी बहीण ‘नाही आहे का? सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांचा सवाल

हेही वाचा >> शरद पवारांच्या पक्षात ऑल इज नॉट वेल?, सोनिया दुहान म्हणतात, “सुप्रिया सुळेंमुळे उरलासुरला पक्ष…”

एक्सवरील पोस्टमध्ये सोनिया दुहान (Sonia Doohan) म्हणाल्या, आज दिल्लीत खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाच्या नीतीला प्रभावित होऊन हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बावरिया, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भुपिंदर शुदा, हरियाणा काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष उदयभान यांच्या नेतृ्त्त्वाखाली विधानसभेच्या माझ्या समर्थकांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मिशन २०२४ च्या काँग्रेसला पाठिंबा देण्याचं काम करणार आहे. येणाऱ्या काळात हरियाणाच्या सर्व विधानसभेसाठी जुन्या सहकाऱ्यांना काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे”, असं सोनिया दुहान म्हणाल्या.

वैमानिक होण्यासाठी पुण्यात आल्या अन्

सोनिया दुहान (Sonia Doohan) यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून बीएससी केलं असून वैमानिकाचं प्रशिक्षण घेण्याकरता त्या पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दिल्ली विद्यापीठात दोन निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं होतं. सोनिया दुहान राष्ट्रवादीच्या महासचिवही होत्या. युवक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

सुप्रिया सुळेंवर टीका करत सोडला होता पक्ष

दरम्यान, त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला होता. “तूर्तास मी कुठेही जात नाही. अजित पवारांच्या पक्षात मी जाणार नाही किंवा भाजपात जाणार नाही. मी शरद पवारांबरोबरच आहे. पण मी सुप्रिया सुळेंमुळेच पक्ष सोडणार आहे. सगळा त्रास सुप्रिया सुळेंमुळेच होतो आहे. मी जबाबदारीने सांगते आहे की सुप्रिया सुळेंमुळे मी पक्ष सोडते आहे”, असं सोनिया दुहान (Sonia Doohan) त्यावेळी म्हणाल्या होत्या.