नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वरिष्ठ डॉक्टरांनी रविवारी सांगितले की, सोनिया यांना शनिवारी संध्याकाळी येथे दाखल करण्यात आले. त्यांना सौम्य ताप आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

Story img Loader