गुजरात सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीच्या अहवालात धक्कादायक खुलासे झाल्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. तीस्ता सेटलवाड यांनी गुजरात सरकार पाडण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींना अडकवण्यासाठी जे काही केले ते काँग्रेसच्या इशाऱ्यावर केले. काँग्रेसने तिस्ता यांना सुमारे ३० लाख रुपये दिले असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- “मोदीभक्त माझ्या ‘पीएचडी’शी तुलना करू शकत नाहीत”; सुब्रमण्यम स्वामी बोलले खरे, पण…

सत्ता मिळवण्यासाठी कट रचला

जे काही केले गेले ते फक्त गुजरात आणि मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी केले गेले. सत्ता मिळविण्यासाठी हा सारा कट रचला गेला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या तिजोरीतून तीस्ता सेटलवाड यांना वैयक्तिक वापरासाठी पैसे दिले असल्याचा खळबळजनक आरोप पात्रा यांनी केला आहे. हा कट जरी अहमद पटेल यांनी राबवला असला तरी याच्या सूत्रधार सोनिया गांधी असल्याचा दावा पात्रा यांनी केला आहे. एसआयटीने आपल्या अहवालात दावा केला होता, की सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना २००२ मध्ये गुजरात सरकार अस्थिर करण्यासाठी काँग्रेसकडून निधी मिळाला होता. तसेच एसआयटीने आपल्या अहवालात म्हटले आहे, की २००२ च्या गोध्रा ट्रेन जाळण्याच्या घटनेनंतर सेटलवाड गुजरातमधील निवडून आलेले सरकार अस्थिर करण्याचा एक मोठा कट रचत होत्या. एवढेच नाही तर त्यासाठी त्यांना प्रतिस्पर्धी राजकीय पक्षातील एका बड्या नेत्याचे आर्थिक पाठबळही मिळाले होते असा दावाही करण्यात आला आहे.

हेही वाचा- “…तर सामान्य माणसाने काय कारायचं”; दिल्ली वकिलांच्या लाखो रुपयांच्या फी वर केंद्रीय कायदा मंत्र्यांची टीका

तीस्ता सेटलवाड यांना काँग्रेसने ३० लाख रुपये दिल्याचा आरोप

एसआयटीच्या म्हणण्यानुसार, आरोपी सेटलवाड सुरुवातीपासूनच या कटाचा भाग होत्या. गोध्रा ट्रेनच्या घटनेनंतर काही दिवसांनी अहमद पटेल यांच्याशी त्यांची भेट झाली होती आणि पहिल्याच भेटीत त्यांना पाच लाख रुपये देण्यात आले होते. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या सूचनेवरून एका साक्षीदाराने त्यांना पैसे दिले असल्याचा दावा एसआयटी आपल्या अहवालात केला आहे. तसेच दोन दिवसांनंतर शाहीबाग येथील सरकारी सर्किट हाऊसमध्ये पटेल आणि सेटलवाड यांच्यात झालेल्या बैठकीत साक्षीदार नेव पटेलच्या सूचनेवरुन सेटलवाड यांना २५ लाख रुपये अधिक देण्यात आले असल्याचेही पोलिसांनी न्यायलयाला सांगितले आहे.