विरोधी पक्ष हा सत्ता काबीज करण्यासाठी टपून बसला आहे. त्यामुळे लोकमतावर प्रभाव पाडण्यासाठी पसरवलेल्या चुकीच्या माहितीबाबत आग्रही भूमिका घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षातील नेत्यांना तयारीला लागण्याचे आदेश आज कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉंग्रेसच्या एक दिवसाच्या चिंतन बैठकीत त्या बोलत होत्या.
लोकसभा निवडणुकीसाठी अवघे अठरा महिने शिल्लक असताना, दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी पक्षाने भरपूर मेहनत घेतली पाहिजे असं सोनिया गांधी म्हणाल्या. आजच्या बैठकीला कॉंग्रेस पक्षातील सर्व जेष्ठ नेत्यांसह पंतप्रधान मनमोहन सिंग हेसुध्दा उपस्थित आहेत.
यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, गेल्या आठ वर्षांत सामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय आपल्या सरकारने घेतले आहेत. मात्र, आपल्याला सध्या फार कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. तरिही आपण जनतेलं दिलेलं वचन पाळणं हा आपला धर्म आहे.
अनेक योजना आणि कायद्यांद्वारे सरकारने देशाचा चेहरा बदलला आह, असं त्या म्हणाल्या.
आजच्या बैठकीला राहुल गांधीसुध्दा उपस्थित आहेत. पक्ष आणि सरकार यांच्यामधील चर्चा बैठकीपुरती मर्यादित राहता कामा नये असं पहिल्यांदाच पक्षाध्यक्षांनी पक्षातील जेष्ठ नेत्यांना सुनावले.      

Story img Loader