मी माझा मुलगा तुम्हाला सोपवतेय, ज्याप्रमाणे तुम्ही मला आपलं मानलं, त्याप्रमाणे त्यालाही आपलं समजून सांभाळून घ्या, अशी भावनिक साद सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या जनतेला घातली आहे. आज राहुल गांधी यांच्या प्रचारार्थ रायबरेली मतदारसंघात इंडिया आघाडीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी हे भावनिक आवाहन केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले सोनिया गांधी?

“आज बऱ्याच दिवसांनी मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली आहे. याचा मला आनंद आहे. मी मनापासून तुमची ऋणी आहे. तुम्ही मला २० वर्षे खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. रायबरेली हे माझे कुटुंब आहे, त्याचप्रमाणे अमेठीही माझे घर आहे. माझ्या आयुष्यातील काही गोड आठवणी इथे जुळल्या आहेत. रायबरेली आणि अमेठीबरोबर आमच्या कुटुंबाचे गेल्या १०० वर्षांचे नाते जोडले आहेत”, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली.

हेही वाचा – शरद पवारांची ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसमध्ये विलीन होणार का? सोनियाविरोधी भूमिकेचं काय?

“इंदिरा गांधींच्या मनात रायबरेलीचे विशेष स्थान होतं”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “इंदिरा गांधींच्या मनात रायबरेलीचे विशेष स्थान होतं. मी त्यांना जवळून काम करताना बघितलं आहे. त्यांचं रायबरेलीच्या जनतेवर प्रेम होतं. पुढे इंदिरा गांधी आणि रायबरेलीच्या जनतेने मला जे शिकवलं तिच शिकवण मी राहुल आणि प्रियंका यांना दिली आहे.”

रायबरेलीच्या जनतेला भावनिक साद

यावेळी बोलताना त्यांनी रायबरेलीच्या जनतेला भावनिक सादही घातली. “मी माझा मुलगा तुम्हाला सोपवतेय, ज्याप्रमाणे तुम्ही मला आपलं मानलं, त्याप्रमाणे त्यालाही आपलं समजून सांभाळून घ्या, राहुल तुम्हाला कधीही निराश करणार नाही”, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, त्यांनी रायबरेलीच्या जनतेचे आभारही मानले. “रायबरेलीच्या जनतेने मला २० वर्ष खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. त्यासाठी मी रायबरेलीच्या जनतेचे आभार मानते”, असे त्या म्हणाल्या.