काँग्रेस हा देशातला सर्वात जुना पक्ष. या पक्षाचा आज अर्थात २८ डिसेंबर रोजी १३७वा स्थापना दिवस होता. या दिवसाच्या निमित्ताने आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते काँग्रेसचा झेंडा फडकावण्यात आला. पण हा झेंडा नेहमीप्रमाणे ध्वजस्तंभावर न फडकावता हातानेच फडकावण्याची वेळ सोनिया गांधींवर आली.

ध्वजस्तंभावर झेंडा फडकावताना त्याला बांधलेली दोरी सुटली आणि काँग्रेसचा ध्वज थेट सोनिया गांधींच्या हातात येऊन पडला. शेवटी तिथे उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी झेंडा पुन्हा फडकवण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी हातानेच हा झेंडा फडकावला.

Story img Loader