समलिंगी संबंध गुन्हाच ठरविण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी व्यक्त केली. संसद या प्रश्नावर नक्की तोडगा शोधेल, असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.
प्रौढ व सज्ञान व्यक्तींमधील परस्परसंमतीने असलेले समलैंगिक संबंध वैध ठरवणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा २००९मधील निर्णय रद्दबातल ठरवत समलिंगी संबंध ठेवणे, हा कायद्याने गुन्हाच असून, त्यासाठी जन्मठेपेची तरतूद कायम आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. यावर अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी न्यायालयाने संसदेवर टाकली. सोनिया गांधी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक असल्याचे स्पष्ट केले.
मानवी हक्कांवर गदा आणणारा, सनातनी कायदा दिल्ली उच्च न्यायालयाने योग्य पद्धतीने घटनाबाह्य ठरविला होता, असे मत मांडून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक असल्याचे स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा