काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचं विवरण दिलं आहे. सोनिया गांधी यांनी त्यांचं इटलीत जे वडिलोपार्जित घर आहे त्याची किंमत २७ लाख रुपये आहे असं म्हटलं आहे. हे घर माझ्या वडिलांचं आहे असंही सोनिया गांधींनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय सोनिया गांधी यांनी त्यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे ते जाहीर केलं आहे.
सोनिया गांधींच्या संपत्तीत किती वाढ झाली?
सोनिया गांधींनी वडिलांचं जे घर आहे त्यातून त्यांना उत्पन्न मिळतं. या घरातून जे उत्पन्न मिळतं त्यासाठी त्यांनी आरबीआयकडून परवाना घेतला आहे. सोनिया गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात सादर केल्याप्रमाणे त्यांच्याकडे १२.५३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या पाच वर्षात स्थावर आणि जंगम मालमत्तेत ७२ लाख रुपयांची वाढ झाली आहे. इंडिया टुडेने या विषयीचं वृत्त दिलं आहे. सोनिया गांधी यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यात संपत्ती ११.८१ कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं. मागील पाच वर्षात सोनिया गांधींची संपत्ती ७२ लाखांनी वाढली आहे. सोनिया गांधींकडे आज घडीला ८८ किलो चांदी आणि १२६७ ग्रॅम सोनं तसंच दागिने आहेत.
१.६९ लाख रुपयांची रॉयल्टी
सोनिया गांधी यांना खासदार म्हणून मिळणारं मानधन, रॉयल्टीद्वारे मिळणारं उत्पन्न, बँकेतल्या ठेवींवरचं व्याज, म्युच्युअल फंड डिव्हिडंट, पुस्तकांची रॉयल्टी यांच्याकडून त्यांना उत्पन्न मिळळतं.
सोनिया गांधींची स्थावर मालमत्ता किती?
सोनिया गांधी यांची स्थावर मालमत्ता – ६. ३८ कोटी
रोख रुपये – ९० हजार
बँकेत जमा-५.३० लाख
म्युच्युअल फंड- ३.८८ कोटी
शेअर्स १.९० लाख
यंग इंडियाचे शेअर्स- १९०० (एका शेअरची किंमत १०० रुपये)
मारुती टेक्निकल सर्व्हिसचे शेअर्स- १० शेअर्स (एका शेअरची किंमत १०० रुपये)
PPF मध्ये जमा रक्कम-१.०४ कोटी
टॅक्स फ्री बॉण्ड्स- २८.५३ लाख ही सध्याची किंमत
सोनं, चांदी- १२६७ ग्रॅम सोनं, ८८ किलो चांदी, बाजार मूल्य १.०७ कोटीरॉयल्टी-१.६९ लाख रुपये
एकूण संपत्ती- ६ कोटी ३८ लाख ११ हजार ४१५ रुपये
सोनिया गांधींकडे नाही स्वतःची कार
सोनिया गांधींकडे स्वतःची कार नाही. २०१९ मध्येही त्यांनी आपल्याकडे कुठलीही कार नाही हेच प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. इंडिया टुडेने याविषयीचं वृत्त दिलं आहे.