यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आज रविवार सकाळी रायपूर येथे पोहोचले आणि रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या नक्षली हल्ल्यातील जखमींची भेट घेतली. पंतप्रधानांनी एका जखमी व्यक्तीची विचारपूस करत घडलेल्या घटनेची माहिती घेतली. नक्षलवाद भारतासमोरील मोठी समस्या असल्याचेही पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
छत्तीसगड राज्यातील निवडणूक लक्षात घेऊन काँग्रेसने परिवर्तन यात्रा काढली होती. ही यात्रा सुकमा येथे पोहोचल्यानंतर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्यात महेंद्र कर्मा जागीच ठार झाले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विद्याचरण शुक्ला हे हल्ल्यात गंभार जखमी झाले असून त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना गु़डगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader