नवी दिल्ली : ‘डीपफेक’ मुद्दय़ावर सरकार लवकरच ‘समाज माध्यम’ कंपन्यांबरोबर चर्चा करणार आहे. या कंपन्यांनी ‘डिपफेक’विरोधात योग्य पावले उचलली नाहीत तर ‘आयटी’ कायद्यांर्तगत त्यांना संरक्षण मिळणार नाही, अशी सूचना तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी सांगितले.
वैष्णव यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकारने ‘डिपफेक’ मुद्दय़ावर कंपन्यांना नुकतीच नोटीस दिल्या आहेत. त्यांना अनेक कंपन्यांनी उत्तरही दिले आहे. परंतु असे प्रकार रोखण्यासाठी कारवाई करणे महत्त्वाचे आहे. येत्या तीन-चार दिवसांत यासाठी समाज माध्यम कंपन्यांबरोबर चर्चा होऊ शकते.