भारताचा माजी कर्णधार आणि निवृत्त क्रिकेटपटू सौरव गांगुली याने भाजपच्या खासदारकीच्या प्रस्तावास नकार दिला आहे. भाजपने गांगुलीला लोकसभेच्या निवडणुकीसाठी तिकीट देण्याची तयारी दाखवली होती.
लोकसभा निवडणुकीत भाजपने त्याच्यासाठी तिकिटाची ‘ऑफर’ दिली होती. भाजप सत्तेत आल्यास त्याला क्रीडामंत्रिपद देण्याचेही आश्‍वासन दिले आहे. ‘हो मला ऑफर आली आहे; पण ती स्वीकारायची की नाही याबाबत संभ्रमावस्थेत आहे. गेल्या काही दिवसांपासून मी माझ्या वेळापत्रकात व्यग्र आहे. मी तुम्हाला लवकरच माहिती देईन,” असे गांगुलीने एका बंगाली वृत्तपत्राशी बोलताना सांगितले होते. पण, गांगुलीने भाजपच्या या प्रस्तावास स्पष्टपणे नकार देत, आपली जागा सभागृहात नसून मैदानात असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader