सेऊल : दक्षिण कोरियातील विरोधी पक्षांनी बुधवारी अध्यक्ष यून युक येओल यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव सादर केला. यून येओल यांनी मंगळवारी अचानक आणीबाणी जाहीर केली होती, त्यानंतर त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. मुख्य विरोधी पक्ष ‘डेमोक्रॅटिक पार्टी’ आणि पाच लहान पक्षांनी संयुक्तपणे हा प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर लवकरात लवकर शुक्रवारी मतदान होऊ शकते.

हेही वाचा >>> लोकसभेत रेल्वे (सुधारणा) विधेयक सादर; खासगीकरण न करण्याचे विरोधकांची मागणी

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
ST seeks UPI solution to holiday money dispute Mumbai news
सुट्या पैशांच्या वादावर एसटीकडून ‘यूपीआय’चा तोडगा; प्रतिसादामुळे उत्पन्नात दुप्पट वाढ
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

अध्यक्षांविरोधातील महाभियोग यशस्वी होण्यासाटी पार्लमेंटच्या दोन-तृतियांश सदस्यांनी ठरावाला पाठिंबा देणे आवश्यक आहे. त्याशिवाय घटनात्मक न्यायालयाच्या नऊ सदस्यांपैकी किमान सहा सदस्यांचा ठरावाच्या बाजूने कौल मिळणे गरजेचे आहे. ‘नॅशनल असेंब्ली’चे ३०० सदस्य आहेत. त्यापैकी १९० जणांनी मंगळवारी आणीबाणीविरोधातील ठरावाच्या बाजूने मतदान केले होते.

हेही वाचा >>> संभल’वरून आरोपांची चिखलफेक; राहुल गांधींचा ताफा गाझीपूर वेशीवर रोखला

मंगळवारच्या घडामोडींनंतर यून यांचे वरिष्ठ धोरण सल्लागार आणि संरक्षणमंत्री किम याँग हुयान यांनी राजीनामा देऊ केला आहे. किम हुयान यांनीच यून येओल यांच्याकडे आणीबाणी लागू करण्याची शिफारस केली असा आरोप करत ‘डेमोक्रॅटिक पार्टी’ने त्यांच्याविरोधातही महाभियोगाचा स्वतंत्र प्रस्ताव दिला आहे. यून येओल यांनी मंगळवारी अचानक मार्शल लॉ लागू केल्यानंतर पार्लमेंटने काही तासांमध्येच त्याविरोधात ठराव करून अध्यक्षांना आणीबाणी मागे घेण्यास भाग पाडले.

Story img Loader