समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य हे बऱ्याचदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मौर्य यांनी नुकतंच हिंदू देवांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर मौर्य यांनी एक पोस्ट केली आहे. देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह आहे. रविवारी (१२ नोव्हेंबर) देशभरात लोकांनी घरोघरी लक्ष्मीपूजन केलं. दरम्यान, मौर्य यांनी त्यांच्या पत्नीची पूजा करून काही फोटो एक्सवर शेअर केले आहेत. तसेच हे फोटो शेअर करताना त्यांनी देवी लक्ष्मीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी एक्सवर लिहिलं आहे की, दीपोत्सवानिमित्त माझ्या पत्नीची पूजा आणि तिचा सन्मान केला. जगातल्या कुठल्याही धर्मात, जातीत, वंश, रंग अथवा देशात जन्मलेल्या मुलाला दोन हात, दोन पाय, दोन कान, दोन डोळे आणि दोन छिद्र असलेलं नाक, एक डोकं, एक पोट आणि एक पाठ असते. परंतु, चार हात, आठ हात, दहा हात, वीस हात, हजार हात असलेलं मूल अद्याप या जगात जन्माला आलेलं नाही. मग चार हात असलेली लक्ष्मी कशी जन्माला येऊ शकते? तुम्हाला लक्ष्मीची पूजा करायची असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीची पूजा करा, तिचा आदर करा. कारण ती तुमच्या कुटुंबाचं पालनपोषण करते, घरात सुख-समृद्धी नांदेल याची काळजी घेते. तसेच आपली जबाबदारी पार पाडते.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

स्वामी प्रसाद मौर्य यांनी यापूर्वीदेखील हिंदू देवांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. काही दिवसांपूर्वी मौर्य म्हणाले होते, अयोध्येतील श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ही एक प्रकारची फसवेगिरी आहे. बौद्ध महोत्सवात त्यांनी रामायणातील काही ओळी वाचून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मौर्य म्हणाले, सरकारने अयोध्येत ढोंग रचलं आहे. देशातल्या तरुणांची आणि नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सरकारने अयोध्येत रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचं ढोंग रचलं आहे.

Story img Loader