संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकाला सर्वपक्षीय खासदारांनी पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ या अधिवेशनात नव्या संसद भवनातून कामकाजाला सुरुवात झाली. या कामकाजादरम्यान एकीकडे विरोधकांनी सरकारवर परखड शब्दांत टीका केली असताना दुसरीकडे झालेल्या टोलेबाजीमुळे हास्यकल्लोळाचेही अनेक प्रसंग उद्भवले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांच्या टोलेबाजीमुळे खुद्द सभापती व देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनाही हसू आवरलं नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राम गोपाल वर्मा!

या हास्यविनोदाला सुरुवात झाली ती यादव यांच्या भाषणाच्या सुरुवातीपासूनच! यादव यांचं नाव घेताना सभापतींनी ‘राम गोपाल वर्मा’ असं घेतल्यामुळे चांगलाच हशा पिकला. खाली बसलेल्या काही सदस्यांनी आठवण करून दिल्यानंतर “आपण हे मुद्दाम केलं नाही” असं म्हणत जगदीप धनखर यांनी योग्य नाव घेत यादव यांना भाषणाची परवानगी दिली.

वडाच्या झाडाखाली दुसरं रोप येत नाही!

दरम्यान, यावेळी चांद्रयान मोहिमेच्या यशासाठी वैज्ञानिकांचं कौतुक करताना राम गोपाल यादव यांनी पंतप्रधानांबरोबरच मंत्री जितेन सिंह यांचंही कौतुक व्हायला हवं असा उल्लेख केला. “मोठ्या झाडांच्या खालच्या झाडांनाही सावली मिळायला हवी”, असं यादव म्हणाले. त्यावर लगेच धनखर यांनी पंडित जवाहरलाल नेहरूं पंतप्रधान असताना बोललं जाणारं एक विधान ऐकवलं. “आपले पहिले पंतप्रधान होते, तेव्हा म्हटलं जायचं की वडाच्या झाडाखाली दुसरी रोपं वाढत नाहीत. हे सांगताना वाईट वाटतंय की इथे वडाच्या झाडाखाली डॉ. जितेनही आहेत”, असं धनखर म्हणाले. यावर सभागृहात पुन्हा एकदा हशा पिकला!

Video: “ए भ**, दहशतवादी..बाहेर फेका याला”, भाजपा खासदाराची लोकसभेत शिवीगाळ; राजनाथ सिहांनी मागितली माफी!

लालू प्रसाद यादव यांचा ‘तो’ किस्सा!

दरम्यान, यानंतर रामगोपाल यादव यांनी लालूप्रसाद यादव यांचा एक किस्सा सांगितला. सभागृहात अनेक सदस्य चंद्रयान मोहिमेवर बोलताना राजकीय टिप्पणी करत असल्याचं यादव म्हणाले. “काही लोकांना हे माहिती नाही की आपले पंतप्रधान किती हुशार आहेत. त्यांना सगळं माहिती आहे की का बोलताय, काय बोलताय”, असं म्हणत रामगोपाल यादव यांनी लालूप्रसाद यादव यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला!

“एकदा राज्यसभेत शपथ होत होती. आमच्या बाजूला लालूप्रसाद यादव बसले होते. त्यांचा एक उमेदवार शपथ घ्यायला आला. मी म्हटलं लालूजी काल हे पूर्ण प्लास्टर घालून बसले होते. मला सांगत होते की झारखंडमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या जामीनावेळी गेलो होतो.. तेव्हा लाठीचार्जमध्ये माझा पाय तुटला.. आज तर हा मस्तपैकी चालतोय.. लालू प्रसाद यादव म्हणाले राज्यसभेत येण्यासाठीच करत होते. मग मी विचारलं तिकीट का दिलं तुम्ही? तर म्हणाले याच्या जातीचा कुठला मोठा माणूस नव्हता. नाईलाजास्तव मला याला तिकीट द्यावं लागलं. मला माहिती आहे की तो फ्रॉड आहे”, असं रामगोपाल यादव यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.