‘अंडर-२३ जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप’ स्पर्धा भारतीय कुस्तीपटूंसाठी नेहमीच सुवर्णसंधी राहिली आहे. मात्र, यंदा भारतीय खेळाडूंना या स्पर्धेला मुकावे लागणार आहे. कारण स्पेनच्या दूतावासाने १७-२३ ऑक्टोबर दरम्यान पॉन्टेवेड्रा येथे होणाऱ्या अंडर-२३ जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी २१ भारतीय खेळाडूंना व्हिसा नाकारला आहे.

हेही वाचा – विश्लेषण : टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान धोकादायक संघ… पण जगज्जेतेपदाची संधी किती?

स्पेनच्या दूतावासाने व्हिसा नाकारण्यामागे आश्चर्यचकीत करणारे कारण दिले आहे. भारतीय खेळाडू नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ स्पेनमध्येच राहतील अशी शंका असल्याचे कारण दुतावासाकडून देण्यात आले आहे. या कारणामुळे व्हिसा नाकारल्याने कुस्ती महासंघाचे सहायक सचिव विनोद तोमर यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

हेही वाचा – बिन्नींच्या अध्यक्षपदावर होणार शिक्कामोर्तब! ; ‘बीसीसीआय’ची आज वार्षिक सभा; ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदासाठी उमेदवाराचा प्रश्न कायम

”स्पेन दुतावासाने व्हिसा नाकारण्याचे जे कारण दिले आहे, ते अनाकलनिय आहे. यापूर्वी अशा परिस्थितीचा आम्ही कधीच सामना केला नव्हता. आमचे खेळाडू स्पेनमध्येच राहतील हा तर्क त्यांनी कोणत्या आधारावर दिला, हे कळायला मार्ग नाही”, अशी प्रतिक्रिया विनोद तोमर यांनी दिली आहे. तसेच या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ३० खेळाडूंनी व्हिसासाठी अर्ज केला होता. त्यापैकी ९ खेळाडूंना व्हिसा मिळाला असल्याची माहितीही विनोद तोमर यांनी दिली.

Story img Loader