युरोपमध्ये बेकायदेशीररित्या गांजाची लागवड केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र फिरवली आणि तीन जणांना अटक केली. तसेच १६६ एकर जागेतील १०० दशलक्ष युरो किमतीचा गांजा नष्ट केला. त्यासोबत कॅनबिडिओलसाठी (सीबीडी) सुमारे ५० टन गांजा एका गोदामात वाळवला जात होता, असं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. सीबीडी विक्री आणि वापर युरोपच्या अनेक भागात कायदेशीर आहे. मात्र औद्योगिक कारणाशिवाय गांजाची लागवड करण्यास मनाई आहे. असं असलं तरी बेकायदेशीररित्या गांजाची लागवड केली जात असल्याचं अनेक प्रकरणं समोर आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही शेती औद्योगिक कारणांसाठी केली जात असल्याचं भासवण्यात आलं. मात्र चौकशी अंती यात तफावत दिसून आली. हा गांजा सीबीडीमध्ये प्रक्रिया करण्यासाठी इटली आणि स्वित्झर्लंडला निर्यात करण्याची योजना असल्याचं समोर आलं. त्यानंतर या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. २०२१ मध्ये ही शेती लावण्यात आल्याचं तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाते. स्पॅनिश पोलीस दरवर्षी दहा लाखांहून अधिक गांजाची शेती दरवर्षी नष्ट करतात.

Story img Loader