पीटीआय, वॉशिंग्टन

अमेरिकेच्या काँग्रेस या कायदेमंडळाच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह या कनिष्ठ सभागृहाचे स्पीकर केविन मॅकार्थी यांना मंगळवारी आपले पद सोडावे लागले. अमेरिकी काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच घडलेल्या या घडामोडींमुळे मॅकार्थी यांच्या रिपब्लिकन पक्षात गोंधळाची अवस्था निर्माण झाली आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या काही लोकप्रतिनिधींनी डेमोक्रॅटिक पक्षाबरोबर संगनमत करून हा बदल घडवून आणला. मंगळवारी दुपारी झालेल्या मतदानामध्ये मॅट गेट्झ यांच्या नेतृत्वाखालील आठ रिपब्लिकन लोकप्रतिनिधींनी मॅकार्थी यांच्याविरोधात मतदान घडवून आणले. त्यांच्या गच्छंतीचा ठराव २१६ विरुद्ध २१० मतांनी मंजूर झाला. यानंतर पॅट्रिक मॅकहेन्री यांची हंगामी स्पीकर म्हणून निवड घोषित करण्यात आली. मॅकार्थी यांच्यावर कोणाचाही विश्वास नसल्यामुळे त्यांना जावे लागले, अशी प्रतिक्रिया गेट्झ यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>अल्फ्रेड नोबेल कोण होते? नोबेल पुरस्कार कधी, कुठे आणि कसा सुरू झाला? वाचा जगातल्या सर्वोच्च पारितोषिकाबद्दल सर्वकाही

अमेरिकेत शटडाऊनचे संकट टाळण्यासाठी मॅकार्थी यांनी डेमोक्रॅटिक पक्षाशी समझोता केल्यावरून गेट्झ आणि त्यांचे सहकारी नाराज होते.काँग्रेसच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज’मध्ये १९१० नंतर प्रथमच पदावरील स्पीकरला हटवण्यासाठी मतदान घेण्यात आले आहे.

Story img Loader