लाहोरमधील रुग्णालयात निधन झालेल्या सरबजितसिंगचे पार्थिव गुरुवारी संध्याकाळी एअर इंडियाच्या विशेष विमानाने अमृतसरला आणण्यात आले. पार्थिव आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी लाहोरला गेलो होते. सरबजितवर शुक्रवारी त्याच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कऱण्यात येणार आहेत.
पाकिस्तानात शिक्षा भोगत असलेला भारतीय कैदी सरबजितसिंगचे बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्याच्यावर लाहोरमधील जिना रुग्णालयात गेल्या एक आठवड्यापासून उपचार सुरू होते. ह्रदयविकाराचा झटका आल्य़ाने सरबजितची प्राणज्योत मालवल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले.
सरबजितच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर ते पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर विशेष विमानाने ते अमृतसरमध्ये आणण्यात आले. सरबजितच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर संपूर्ण पंजाब राज्यात शोककळा पसरली आहे. विमानतळाबाहेर हजारो लोकांनी गर्दी केली आहे.

Story img Loader