सध्या समाजमाध्यमांवर विमानाच्या कॉकपिटचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये विमानाचे पायलट हातात गुझिया (उत्तर भारतातील गोड पदार्थ) आणि कॉकपिट कन्सोलवर पेय पदार्थ ठेवून सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. हे प्रकरण व्हायरल झाल्यानंतर या दोन्ही पायलटना ऑफ रोस्टर (उड्डाणाच्या कर्तव्यातून हटवलं) केलं आहे. ज्या विमानातील हा फोटो आहे ते विमान दिल्लीहून गुवाहाटीला जात होतं. या प्रकरणाची माहिती देताना एअरलाईनचे प्रवक्ते म्हणाले की, “या प्रकरणाचा तपास प्रलंबित आहे.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पायलटांनी असं करून हवाई सुरक्षा धोक्यात आणली होती. ही घटना होळीच्या (८ मार्च) दिवशी घडली होती. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. या घटनेबाबत बोलताना स्पाइसजेट एअरलाईनचे प्रवक्ते म्हणाले की, कॉकपिटच्या आत कोणताही पदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे. सर्व पायलट क्रू या नियमाचं पालन करतात. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर दोन्ही पायलटांवर कारवाई केली जाईल.

हे ही वाचा >> “मला माफ करा योगीजी”, एन्काऊंटरच्या भीतीने बाइकचोर हातात पोस्टर घेऊन थेट पोलीस ठाण्यात दाखल

प्रकरणाची डीजीसीएने घेतली दखल

ज्या फोटोवरून हा सगळा प्रकार समोर आला त्यामध्ये दिसतंय की, पायलटच्या हातात गुझिया आहे आणि कॉकपिट कन्सोलवर पेय पदार्थ ठेवला आहे. या पेय पदार्थाचा एखादा थेंब जरी कन्सोलमध्ये गेला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर विमान वाहतूक नियामक संस्था डीजीसीएने याची दखल घेतली आणि स्पाइसजेटला योग्य पावलं उचलण्यास सांगितले.