इंडिगो विमानाची रखडपट्टी समोर आल्यानंतर आता स्पाइसजेट विमानातील एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानात एक प्रवासी शौचालयात जवळपास तासभर अडकला होता. विमानातील कर्माचाऱ्यांनी अतिशय हुशारीने अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढलं, असं स्पाईसजेटने स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईहून पहाटे २ वाजून १३ मिनिटांनी टेक ऑफ केल्यानंतर एक प्रवासी शौचालयात गेला. बेंगळुरूमध्ये पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी विमान लँडिंग होईपर्यंत त्याला शौचालयातच थांबावं लागलं. शौचालयाच्या दरवाजाच्या लॉकमध्ये बिघाड झाल्याने हा प्रवासी आतमध्ये अडकून बसला. स्पाईसजेटने एका निवेदनात या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसंच, या प्रवासातील पूर्ण परतावाही त्याला दिला आहे. तसंच, संबंधित प्रवासाने विमान कंपनीला संपूर्ण प्रवासात मदत केल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं.

हेही वाचा >> अग्रलेख : मक्तेदारी, मिजास, मर्यादा!

“१६ जानेवारी रोजी एक प्रवासी दुर्दैवाने मुंबई ते बेंगळुरूला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या फ्लाइटमध्ये सुमारे एक तास लॅव्हेटरीमध्ये अडकला होता. तर विमान हवेत असतानाच हा प्रकार घडला. संपूर्ण प्रवासात आमच्या क्रूने मदत आणि मार्गदर्शन केले”, स्पाइसजेटने सांगितले.

असा उघडला दरवाजा

दार उघडत नसल्याने प्रवाशाला शांत करण्याकरता क्रूने त्याच्यासाठी एक चिठ्ठी पाठवली. ज्यात घाबरू नका असं लिहिलं होतं. “सर, आम्ही दरवाजा उघडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, आम्ही दरवाजा उघडू शकलो नाही. घाबरू नका, आम्ही काही मिनिटांत उतरत आहोत. त्यामुळे कृपया कमोडचे झाकण लावा आणि त्यावर बसा आणि स्वतःला सुरक्षित करा. मुख्य दरवाजा उघडा आहे, अभियंता येतील. घाबरू नका.”

क्रू मेंबरने प्रवाशासाठी लिहिलेलं पत्र

इंजिनिअरने केली मदत

बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आगमन झाल्यावर, एका अभियंत्याने (इंजिनिअरने) शौचालयाचा दरवाजा उघडला आणि प्रवाशाला तात्काळ वैद्यकीय मदत दिली, असे एअरलाइनने सांगितले. “स्पाईसजेट प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहे, असंही कंपनीने निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेक विमान कंपन्यांच्या विमानात सातत्याने बिघाड होत आहेत. तर काही ठिकाणी विमानांच्या उड्डाणात विलंब होत आहे. १४ जानेवारी रोजी दिल्ली ते गोवा या विमानाला तब्बल १३ तास विलंब झाला. परिणामी प्रवाशांनी संताप व्यक्त केला. आरामात आणि कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचण्याकरता प्रवासी जास्तीचे पैसे टाकून विमान प्रवास निवडतात, मात्र अशा घटनांमुळे प्रवाशांचा हिरमोड होतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spicejet passenger gets stuck inside toilet for an hour on mumbai bengaluru flight sgk