स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी बुकी म्हणून अटक केलेला अमित सिंग हा वास्तविक क्रिकेटपटू असल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली. ही माहिती समजल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अमित सिंगला निलंबित केले. 
अमित सिंग हा २००८ ते २०१२ पर्यंत राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. आयपीएलमध्ये त्याने २३ सामने खेळले आहेत. गुजरात क्रिकेट संघटनेकडे त्याची नोंदणी आहे. त्याने रणजी स्पर्धेमध्येही भाग घेतला होता. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त नीरजकुमार यांनी अमितकुमार नावाच्या बुकीबद्दल उल्लेख केला होता. मात्र, हा बुकी अमितकुमार नसून, अमित सिंग असल्याचे तपासात आढळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा