मुलाने दिलेला घरचा आहेर.. मुंबई पोलिसांनी जावई मयप्पनला केलेली अटक.. आयपीएलबरोबर बीसीसीआयची होणारी नामुष्की.. सट्टेबाज आणि चेन्नई सुपर किंग्जचे कनेक्शन, हे सारे पाहता आता बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या भोवतीचा फास आवळला जात आहे. श्रीनिवासन यांना आता लक्ष्य बनवण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. सट्टेबाजीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या रडारवर आलेला गुरुनाथ मयप्पन शुक्रवारी पोलीस मुख्यालयात दाखल झाला. मुंबई पोलिसांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मयप्पनची चौकशी केली आणि त्यानंतर रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते टी. पी. त्रिपाठी यांनी श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, पण कालांतराने त्रिपाठी यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे पक्षाने जाहीर केले.
मयप्पन आपल्या वकीलासह शुक्रवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाला. विमानतळावरच मयप्पनला मुंबई पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. मयप्पनच्या चौकशीसाठी पोलिसांनी विशेष तयारी केली होती.
आम्ही मयप्पनच्या चौकशीसाठी प्रश्नावली तयार करून ठेवली होती. मयप्पन आणि विंदूला समोरासमोर आणून अनेक मुद्दय़ांची शहानिशा केली जाणार असल्याचे सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले.
अटक झालेल्या मयप्पनला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
विंदू मयप्पनला मुली पुरवत होताशुक्रवारी पुन्हा पोलिसांनी विंदूची चौकशी केली. मयप्पन हा स्वत: सामन्यात सट्टा लावायचा. विंदू आणि मयप्पनचा मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असावा, असा पोलिसांना दाट संशय आहे. विंदू मयप्पनला हवाईसुंदरी, मॉडेल्स आणि अभिनेत्री पुरवीत असे, अशी माहितीही दोघांच्या मोबाइल संभाषणात उघड झाली आहे.
विंदूने सट्टेबाजांना पळून जाण्यास मदत केली
विंदूने पवन आणि संजय जयपूर या दोन सट्टेबाजांना भारताबाहेर पळून जाण्यास मदत केली होती. पण त्यानेच राजा आणि चितू या आणखी दोन सट्टेबाजांना भारताबाहेर पळून जाण्यास मदत केल्याचे उघड झाले आहे. विंदूने आपल्या आयपॅड आणि लॅपटॉपमधील सट्टेबाजीसंदर्भातला डेटा डिलीट केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
असद रौफ पाकमध्ये पसार
सट्टेबाजी प्रकरणात विंदू आणि सट्टेबाज प्रेम तनेजा यांच्या चौकशीत पाक पंच असद रौफ याचे नाव समोर आले. परंतू, २१ मे रोजी रौफ पाकिस्तानात पसार झाल्याची माहिती रॉय यांनी दिली. सट्टेबाज पवन जयपूरने रौफसाठी भेटवस्तू पाठवल्या होत्या. या भेटवस्तू अद्याप दिल्ली विमानतळावर असून पोलिस ताब्यात घेणार आहेत.
आता लक्ष्य श्रीनिवासन!
मुलाने दिलेला घरचा आहेर.. मुंबई पोलिसांनी जावई मयप्पनला केलेली अटक.. आयपीएलबरोबर बीसीसीआयची होणारी नामुष्की.. सट्टेबाज आणि चेन्नई सुपर किंग्जचे कनेक्शन, हे सारे पाहता आता बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या भोवतीचा फास आवळला जात आहे. श्रीनिवासन यांना आता लक्ष्य बनवण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
First published on: 25-05-2013 at 04:22 IST
TOPICSश्रीनिवासन
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spot fixing meiyappan arrested as pressure mounts on srinivasan to resign