सन २०१४ च्या लोकसभेसाठी समाजवादी पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली असून आपल्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली. स्वत: पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव हे मणिपूरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.
समाजवादी पक्षाने आज जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये १८ विद्यमान खासदार आणि आमदारांसह एक मंत्री आणि राज्य विधानसभेचे अध्यक्ष यांचा समावेश असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते राम गोपाल यादव यांनी दिली.
लोकसभेसाठी उमेदवार घोषित करण्यामध्ये सपाने आघाडी घेतली असून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. तसेच पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर केल्यामुळे ते निवडणुकीच्या तयारी लागतील, असेही यादव यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आज जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी कनौजच्या खा. डिंपल यादव, मुख्यमंत्र्यांचे चुलत भाऊ बदाऊनचे खा. धमेंद्र यादव आदींचा समावेश आहे.
दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव राहुल गांधी यांचे पारंपरिक मतदारसंघ राय बरेली आणि अमेठीमधून उमेदवार जाहीर केले का, असा प्रश्न विचारला असता पहिल्या टप्प्यात ५५ उमेदवारांची नावे जाहीर केली असून अद्याप २५ उमेदवारांची नावे निश्चित झाली नसल्याचे सांगत यादव यांनी थेट उत्तर दिले नाही. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन उमेदवारांची निवड आधीच जाहीर करण्यात आल्याचे यादव यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा