Squid games on Delhi streets Video Delhi Election 2025 Campaign: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीत आप, भाजपा आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये लढत पाहायला मिळत आहे. दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात आपकडून नावीन्यपूर्ण पद्धतीने प्रसिद्ध कोरियन वेब सीरिज स्क्विड गेम्सचा वापर केला जात आहे. कर्जात बुडालेल्या लोकांना एका बेटावर बोलावून पैशांचं अमिष दाखवून त्यांना जीवघेण्या खेळात भाग घ्यायला लावणे असं स्क्वीड गेमचं स्वरूप आहे. आपकडून अशाच प्रकारच्या गेम्सचा प्रचारासाठी उपयोग केला जात आहे. यासंबंधीत एक व्हिडीओ आपने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आम आदमी पक्षाकडून वेगळ्या अंदाजात विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला जात आहे. आपने पुन्हा एकदा प्रचाराचा नवीन फंडा वापरला आहे. यापूर्वी आम आदमी पक्षाने लग्नाची वरात काढली होती, ज्यामध्ये नवरदेवच गायब होता. याच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष ज्यांनी अद्याप मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही यांना टोला लगावण्यात आला होता.

आता सोशल एक्सपीरिमेट असे नाव देत आपने भाजपाचे नेते आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांची प्रसिद्धीची तुलना केली आहे. एका गेममध्ये सहभागी झालेल्या लोकांना मुखवटे घातलेल्या व्यक्ती कोण आहेत? आणि त्यांचा पक्ष कोणता आहे? याबद्दल विचाणा करत आहेत. या नेत्यांमध्ये आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, आतिशी, राघव चढ्ढा, मनीष सिसोदिया, रमेश बिधुरी, परवेश वर्मा, वीरेंद्र सचदेवा, राजकुमार बल्लान इत्यादींचा समावेश होता.

या महिन्याच्या सुरुवातीला आम आदमी पक्षाने ‘भाजप का दुल्हा कौन’ असे फलक घेऊन नवरदेवाशिवाय लग्नाची वरात काढली होती.

“लग्नाची वरात निघाली, पण नवरदेव दिसत नाही. भाजपा ही नवरदेव नसलेली लग्नाची वरात आहे,” अशी कमेंट करत आपचे नेते संजय सिंह आणि इतरांनी या मिरवणुकीत भाग घेतला होता. तसेच या वरातीचा व्हिडिओ देखील पोस्ट केला होता. इतकेच नाही तर, नेता नाही, धोरण नाही, उद्दीष्टही नाही, असा टोलाही संजय सिंह यांनी भाजपाला लगावला होता. दरम्यान दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.