आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली तुरूंगवास भोगलेला भारतीय संघाचा गोलंदाज एस. श्रीशांत क्रिकेटनंतर आता राजकारणातील  इनिंगला सुरूवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी केरळ विधानसभा निवडणुकीत श्रीशांत भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निवडणुकीसाठी श्रीशांतला केरळच्या एका ज्येष्ठ भाजप नेत्याकडून गळ घालण्यात आली असून, श्रीशांतला याबाबत विचारले असता अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे त्याने सांगितले. बुधवारी मी माझा निर्णय जाहीर करेन, असेही तो म्हणाला. श्रीशांत एर्नाकुलम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. भाजपसमावेशाबाबतही उद्याच माहिती मिळेल, असेही त्याने नमूद केले आहे.

Story img Loader