महेद्रसिंग धोनी आणि हरभजनसिंग यांनीच आपल्या मुलाला अडकविले असे म्हणणारे क्रिकेटपटू एस. श्रीशांतचे वडील शांताकुमारन नायर यांनी आपले आरोप मागे घेतले आहेत. त्यांनी आपल्या आरोपांबद्दल धोनी आणि हरभजनसिंग यांची माफीही मागितली.
श्रीशांतला दिल्ली पोलिसांनी गुरुवारी पहाटे स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून अटक केली. त्यानंतर या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शांताकुमारन नायर यांनी धोनी आणि हरभजनसिंगवर आपल्या मुलाला अडकविल्याचे आरोप केले. धोनी आणि हरभजनसिंग यांनीच हे कारस्थान रचल्याचे त्याच्या वडिलांनी म्हटले होते. मात्र, गुरुवारी दुपारी दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत धोनी आणि हरभजनसिंग यांचा स्पॉट फिक्सिंगशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. या दोघांविरुद्ध पोलिसांचा कोणताही संशय नसल्याचे दिल्लीचे पोलिस आयुक्त नीरजकुमार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शांताकुमारन नायर यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली.

Story img Loader