श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटात सापडली असून देशभरात आंदोलन केलं जात आहे. आंदोलकांनी अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या घराचा ताबा घेतला आहे. यादरम्यान श्रीलंकेचे माजी अर्थमंत्री बसील राजपक्षे देश सोडून दुबईला जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र विमानतळावर लोकांनी त्यांना ओळखलं. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवासासाठी परवानगी न दिल्याने त्यांना देशातच थांबावं लागलं असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बसील राजपक्षे हे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांचे भाऊ आहेत. राजपक्षे कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीआयपी टर्मिनलमधून देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात होते. याचवेळी काही लोकांनी त्यांना ओळखलं आणि देश सोडून जाण्याला विरोध केला अशी सूत्रांची माहिती आहे. राजपक्षे यांचे विमानतळावरील फोटो समोर आले आहेत.

Sri Lanka Crisis: राष्ट्रपती भवनाचा ताबा मिळवताच आंदोलकांनी स्विमिंग पूलमध्ये मारल्या उड्या, जीममध्ये केला व्यायाम

सूत्रांच्या माहितीनुार, राजपक्षे रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी विमानतळावरील चेक-इन काऊंटरवर दाखल झाले होते. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी प्रवासासाठी नकार दिल्याने पहाटे ३.१५ पर्यंत ते थांबले होते. यानंतर ते विमानतळामधून बाहेर पडले.

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत पंतप्रधानांच्या बेडवर आंदोलकांचं WWF, व्हिडीओ व्हायरल

श्रीलंका इमिग्रेशन अँड एमिग्रेशन ऑफिसर्स असोसिएशनने रॉयटर्सला सांगितलं की, त्यांच्या सदस्यांनी कोलंबो विमानतळाच्या व्हीआयपी लाउंजमध्ये बेसिल राजपक्षे यांना सेवा देण्यास नकार दिला. असोसिएशनच्या चेअरमनने दिलेल्या माहितीनुसार, “देशातील स्थिती पाहता इमिग्रेशन अधिकाऱ्यांवर कोणत्याही मोठ्या व्यक्तीला देश सोडून जाण्यास परवानगी दिली जाऊ नये यासाठी दबाव आहे”.

“आम्हाला आमच्या सुरक्षेची चिंता आहे. त्यामुळे जोपर्यंत या मुद्द्यावर तोडगा मिळत नाही तोवर व्हीआयपी लाउंजमध्ये काम करणाऱ्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांची सेवा बंद केली आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान बसील राजपक्षे यांना भारतात आश्रय दिला जाणार असल्याचं वृत्त भारत सरकारने फेटाळलं आहे. अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी पलायन करुन भारतात आश्रय घेतल्याचा दावाही फेटाळण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीलंकेतील कोणतीही मोठी व्यक्ती विमानाने उड्डाण करुन देशाबाहेर जाऊ शकत नाही.

अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनाही अशाचप्रकारे देश सोडून जाण्यापासून रोखण्यात आलं होतं असं वृत्त एएफपीने दिलं आहे. अध्यक्षांना अटकेपासून संरक्षण असून पद सोडण्याआधी देश सोडून जाण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती आहे. पण इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्याने तेदेखील देश सोडून जाऊ शकले नाहीत. यानंतर त्यांना पत्नीसोबत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शेजारी असणाऱ्या लष्करी तळावर रात्र घालवावी लागली.