नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला स्वबळावर केंद्रातील सत्ता मिळाल्यामुळे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांची दिल्लीतील आता सद्दी संपणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर श्रीलंकेला आनंद झाला आहे. आपल्या राजकीय मागण्यांच्या पूर्ततेसाठीजयललिता यांना  केंद्र सरकारवर दबाव आणता येणार नाही, असे श्रीलंकेला वाटत आहे.
तामिळनाडूच्या कोणत्याही प्रभावाखाली न येता आपल्याला केंद्र सरकारसमवेत थेट विचारविनिमय करता येईल याबद्दल अध्यक्ष महेन्द्र राजपक्षे यांनी समाधान व्यक्त केले आहे. श्रीलंका सरकारचे प्रवक्ते व प्रसारमंत्री केहेलिया रामबुकवेल्ला यांनी सोमवारी उपरोक्त मत मांडले. दिल्लीत आता प्रबळ सरकार येणार असल्याची बाब आमच्यासाठी अत्यंत चांगली असून केंद्र सरकार जो काही निर्णय घेईल, त्यावर तामिळनाडूसारख्या राज्यांचा अकारण प्रभाव असणार नाही, याकडे रामबुकवेल्ला यांनी लक्ष वेधले.
दिल्लीत आता मजबूत सरकार असून भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आपल्या बहुमतासाठी कोणत्याही पक्षावर अवलंबून रहावे लागणार नाही. साहजिकच, जयललिता यांच्या पक्षाचे ३७ खासदार संसदेत निवडून गेले असले तरी ते केंद्र सरकारवर प्रभाव पाडू शकणार नाहीत, असा दावा रामबुकवेल्ला यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा