श्रीलंकेमध्ये आर्थिक संकटामुळे अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून येथील जनतेने चांगलाच आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी देशाबाहेर पलायन केलं आहे. ते मालदीवमध्ये गेले असून तिथून दुबईला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या रानील विक्रमसिंघे यांची श्रीलंकेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. देशाची सूत्रे हाती घेताच त्यांनी संरक्षण दल तसेच पोलिसांना कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ते सर्व करा, असे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणी: रानील विक्रमसिंघेंची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती

“मी लष्कर प्रमुख तसेच पोलिसांना कायदा व सुव्यवस्था स्थापित करण्यासाठी आवश्यक ते सर्व करा, असे आदेश दिले आहेत,” असे विक्रमसिंघे यांनी आपल्या संबोधनात सांगितले. तसेच जे आंदोलक माझ्या घरात घुसले आहेत. ते मला माझी जबाबदारी पार पाडण्यापासून रोखत आहेत. आपल्याला आपल्या संविधानचे संरक्षण करावे लागले. फॅसिस्ट शक्तींना आपल्यावर राज्य करण्यापासून रोखायचे आहे. लोकशाहीला असलेला फॅसिस्ट शक्तींचा धोका आपण संपवला पाहिजे,” असेही विक्रमसिंघे यांनी आपल्या संबोधनात श्रीलंकेच्या जनतेला उद्देशून सांगितले.

हेही वाचा >>> Sri Lanka Crisis: सनथ जयसूर्या पंतप्रधानांवर संतापला; म्हणाला “विचार करा मिस्टर बीन…”

दरम्यान, रानील विक्रमसिंगे यांनी श्रीलंकेच्या हंगामी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा धारण केला होता. काही महिला आणि पुरुष आंदोलक पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांच्या शासकीय निवासस्थानात श्रीलंकेचा राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी घुसले होते. पोलिसांनी या आंदोलकांना रोखण्यासाठी पाण्याच्या माऱ्याचा तसेच अश्रूधुराचा उपयोग केला. मात्र, आंदोलकांची संख्या जास्त असल्यामुळे पोलीस तसेच संरक्षण दल त्यांना रोखू शकले नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka prime minister ranil wickremesinghe ordered police to restore law and order in country prd