पीटीआय, नवी दिल्ली

श्रीलंकेचा भूभाग भारताच्या हिताविरोधात वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे आश्वासन श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. भारताने श्रीलंकेतील चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केल्यानंतर दिसनायके यांनी हे विधान केले आहे. दिसनायके तीन दिवस भारताच्या दौऱ्यावर आहेत.

Saif Ali khan
सैफ अली खान हल्ल्यातील संशयित आरोपी छत्तीसगडमधून ताब्यात, मुंबई पोलिसांच्या मदतीने आरपीएफने कसा लावला छडा?
Arvind Kejriwal Car Attacked
Arvind Kejriwal : Video : अरविंद केजरीवाल यांच्या…
Stray dog killing Morocco
मोरोक्कोमध्ये ३० लाख भटके कुत्रे मारले जाणार, कारण ऐकून हैराण व्हाल
Kolkata RG Kar Doctor Case
Kolkata RG Kar Doctor Case : “मला गोवण्यात आलं, पण यात एका आयपीएसचा…”, न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आरोपी संजय रॉय काय म्हणाला?
R.G. Kar Medical College and Hospital rape and murder
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या वडि‍लांना अश्रू अनावर; न्यायमूर्तींना म्हणाले, “तुमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला…”
no alt text set
Kolkata RG Kar Doctor Case Verdict: महिला डॉक्टरवर बलात्कार-खून प्रकरणात संजय रॉय दोषी; २० जानेवारीला होणार शिक्षेची घोषणा
Image Of Rahul Gandhi And PM Narendra Modi.
Rahul Gandhi : “राहुल गांधी कट्टरपंथी डाव्यांच्या प्रभावाखाली”, काय आहे राहुल गांधींना लक्ष्य करण्याची भाजपाची नवी पद्धत
IITian Baba Abhay Singh
IIT मधून शिकलेले बाबा महाकुंभ सोडून गेले? की त्यांना जायला भाग पाडलं? स्वतःच माहिती देताना म्हणाले…
Arvind Kejriwal
“दिल्लीतल्या भाडेकरूंनाही मोफत वीज व पाणी देणार”, निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांची मोठी घोषणा

दरम्यान, भारत आणि श्रीलंकेने त्यांच्या भागीदारीचा विस्तार करण्यासाठी एक दूरदर्शी दृष्टीकोन स्वीकारत सोमवारी संरक्षण सहकार्य कराराला अंतिम रूप देण्याचा निर्णय घेतला. तसेच ‘पॉवर ग्रिड कनेक्टिव्हिटी’ आणि बहु-उत्पादन पेट्रोलियम पाइपलाइन निर्माण करून ऊर्जा संबंध मजबूत करण्याचा संकल्पही केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष दिसानायके यांच्यात झालेल्या विस्तृत चर्चेदरम्यान हे निर्णय घेण्यात आले.

हेही वाचा >>>Indore Beggars : भीक देताय सावधान! ‘या’ शहरात भिकाऱ्यांना पैसे दिल्यास दाखल होणार गुन्हे

पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही बाजूंनी आर्थिक भागीदारीसाठी गुंतवणूक आधारित विकास आणि जोडणीवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही ठरवले आहे की भौतिक, डिजिटल आणि ऊर्जा जोडणी हे आमच्या सहकार्याचे मुख्य स्तंभ असतील. श्रीलंकेच्या वीज प्रकल्पांना द्रवरूप नैसर्गिक वायूचा (एलएनजी) पुरवठा करण्यासाठी काम केले जाईल, असेही मोदी यांनी या वेळी सांगितले.

Story img Loader