श्रीनगरमध्ये एका कारवाईदरम्यान जम्मू -काश्मीरच्या एका कुख्यात दहशतवाद्याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये ठार केले. टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट)चा कमांडर अब्बास शेख आणि त्याचा एक साथीदार श्रीनगरच्या अलुची बाग परिसरात पोलिसांकडून झालेल्या कारवाईत ठार झाला आहे. अब्बास शेख हा गेल्या २६ वर्षांपासून दहशतवादी कारवाया करत होता तसेच अनेक तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करुन घेत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसओजीच्या दहा कमांडोंनी सोमवारी संध्याकाळी श्रीनगरमधील आलूचीबाग क्रिकेट मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट) चा नेता अब्बास शेख आणि त्यांचा सहकारी डेप्युटी कमांडर साकीब मंजूर यांना घेरले आणि ठार केले. अब्बासचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश होता. दोघेही बराच काळ पोलिसांच्या रडारवर होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. दोघेही अनेक नागरिकांच्या हत्येत सहभागी होते.

खोऱ्यातील सर्वात जुन्या अतिरेक्यांपैकी एक असणारा अब्बास शेख १९९६ मध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सामील झाला होता आणि गेल्या वर्षापासून द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) चा प्रमुख होता. काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी (आयजीपी) जाहीर केलेल्या १० मोस्ट वॉन्टेड दहशतवादी कमांडरच्या यादीत त्यांचे नाव अव्वल होते.

खोऱ्यातील दहशतवादविरोधी कारवायांशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “जरी त्याने स्वतः दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेतला नसला तरी तो त्याच्यामागचा मेंदू होता. त्याने योजना तयार केल्या आणि आदेश दिले.”

मंगळवारी, उत्तर काश्मीरच्या सोपोरमध्ये रात्रीच्या कारवाईत टीआरएफशी संबंधित आणखी तीन दहशतवादी ठार झाले. टीआरएफ हा लष्कर-ए-तोयबाचा एक गट असल्याचे पोलिसांचे मत आहे. यासह, पोलिसांनी सांगितले, या वर्षी खोऱ्यात आतापर्यंत १०२ दहशतवादी मारले गेले आहेत. त्यापैकी केवळ १ जुलैपासून ३९ दहशतवादी ठार झाले आहेत.

पोलिस, लष्करातील जवान आणि स्थानिक व्यापारी सतपाल निश्चल यांच्या हत्येसह किमान २७ अतिरेकी हल्ल्यांमध्ये शेखचे नाव होते. दक्षिण काश्मीरच्या कुलगाममधील रामपूर गावाचा रहिवासी, शेख २५ वर्षापूर्वी केवळ २० वर्षांचा असताना हिजबुल मुजाहिदीनमध्ये सामील झाला आणि दोनदा अटक होऊनही तो पुन्हा दहशतवादी संघटनेमध्ये परतला. २००४ मध्ये एका वर्षानंतर त्याला सोडण्यात आले. २००७ मध्ये, त्याला पुन्हा अटक करण्यात आली आणि चार वर्षे तुरुंगात होता.