काश्मीर खोऱयातील सौरा भागात दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यातील धुमश्चक्री गुरुवारी सकाळी संपली. दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारामध्ये सहा पोलीस जखमी झाले आहेत. पोलीसांच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. त्यांचा कसून शोध घेण्यात येतो आहे.
सौरामधील अहमदनगर भागात काही दहशतवादी लपल्याची टीप पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर हा संपूर्ण परिसर बुधवारी संध्याकाळी रिकामा करण्यात आला.पोलीसांनी परिसर रिकामा केल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध सुरू असताना त्यांनी पोलीसांवर ग्रेनेड फेकण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत बुधवारी रात्री चार पोलीस जखमी झाले होते. गुरुवारी सकाळी आणखी दोन जण जखमी झाले. चकमक संपल्यानंतर दहशतवादी लपून बसलेल्या घरामध्ये पोलीसांनी शोध मोहीम सुरू केली. त्याचबरोबर पळून गेलेल्या दहशतवाद्यांचाही शोध घेण्यात येतो आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा