Srinagar Sunday Market Terrorists Attack : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी रविवारी (३ नोव्हेंबर) दुपारी एका बाजारात गर्दीच्या वेळी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात सहा नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथे त्यांच्यावर उपाचर चालू आहेत. दरम्यान, संरक्षण दलाने घटनास्थळ व आसपासच्या भागात शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच श्रीनगरमधील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

या घटनेची माहिती देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की दहशतवाद्यांनी टीआरसीजवळ तुफान गर्दी असलेल्या बाजारपेठेत ग्रेनेड फेकले. ज्यामुळे गोंधळ झाला. लोक सैरावैरा धावू लागले. या हल्ल्यात सहापेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. मात्र अद्याप हल्लेखोरांपैकी कोणीही पोलिसांच्या अथवा सुरक्षा दलांच्या हाती लागलेला नाही. या हल्ल्याशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

Kanpur Crime News
Kanpur : धक्कादायक! महिलेची हत्या करून मृतदेह ‘व्हिआयपी’ परिसरात पुरला; चार महिन्यांनी ‘असं’ उलगडलं घटनेचं रहस्य
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
NMC, safety doctors, medical colleges, doctors,
धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पोटातून डॉक्टरांनी काढल्या तब्बल ६५ वस्तू; शस्त्रक्रियेदरम्यान झाला मृत्यू, पोटात आढळलं…
Analog Space Mission :
Analog Space Mission : भारताची पहिली ॲनालॉग स्पेस मिशन लडाखमध्ये सुरू; इस्रोची ही अंतराळ मोहीम काय आहे?
Delhi crime News
Delhi : धक्कादायक! टोपीवरून झालेल्या वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या; आरोपीच्या आईने पुरवली बंदूक
Iranian university hijab protest
Iran Hijab Protest: हिजाब सक्तीच्या विरोधात विद्यार्थीनीचं निर्वस्त्र होत आंदोलन; व्हिडीओ व्हायरल होताच विद्यापीठानं केली कारवाई
Lawrence Bishnoi Gang
लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या शत्रू टोळीचा उद्योगपतीच्या घरावर गोळीबार; दोघांना अटक
Illegal Entry In US
Illegal Entry In US : वर्षभरात अमेरिकेत बेकायदेशीर मार्गाने घुसखोरी करणाऱ्या ९० हजार भारतीयांना अटक; ‘या’ राज्यातील लोकांची सर्वाधिक संख्या

हे ही वाचा >> Iran Hijab Protest: हिजाब सक्तीच्या विरोधात विद्यार्थीनीचं निर्वस्त्र होत आंदोलन; व्हिडीओ व्हायरल होताच विद्यापीठानं केली कारवाई

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा CCTV Video समोर

जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी गेल्या महिन्यातील एका रविवारी (२० ऑक्टोबर) काही स्थलांतरित नागरिकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, दहशतवाद्यांनी एका डॉक्टरचीही देखील हत्या केली. या दहशतवादी हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. हत्या करण्यात आलेले मजूर बोगद्याच्या प्रकल्पावर काम करत होते. काम करत असतानाच त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. ज्यामध्ये दहशतवादी बंदुका दाखवत आहेत. दोन्ही दहशतवाद्यांचे चेहरे या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहेत. या दहशतवाद्यांच्या हातात अमेरिकन बनावटीची एम-४ कार्बाइन रायफल व एके-४७ रायफल दिसत आहे.

Jammu and Kashmir Terrorist Attack CCTV Video
गांदरबलमध्ये दहशतवाद्यांकडून सात मजुरांच्या हत्या. (PC : TIEPL)

हे ही वाचा >> VIDEO : केस पकडले, कानशीलात लगावल्या; तरुणाची भररस्त्यात मैत्रिणीला मारहाण

गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात स्थलांतरित कामगारांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. दहशतवाद्यांनी रात्री साडेसातच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याजवळ हल्ला केला. यावेळी काही मजूर काम करत होते, तर काहीजण काम थांबवून जेवण करण्यासाठी तिथून बाहेर पडत होते. या हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचून परिसरात सुरक्षा वाढवली. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचण्याआधीच दहशतवादी तिथून फरार झाले होते. बोगद्याचं काम जिथे सुरू आहे, तिथून जवळच मजुरांची राहण्याची व्यवस्था आहे. एक बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग आहे.