तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता लाचप्रकरणी दोषी ठरल्याने श्रीरंगम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून द्रमुकने त्यासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. या पोटनिवडणुकीमुळे सत्तारूढ अभाअद्रमुकच्या कामगिरीचा निकाल लागणार असून विरोधी पक्षालाही आपली कुवत कळणार आहे. भाजपनेही ही पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
येत्या १३ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून द्रमुकने एन. आनंद यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आनंद यांनी २०११ मध्ये जयललिता यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती आणि ते पराभूत झाले होते.
गेल्या निवडणुकीत द्रमुकचा पराभव केल्यानंतर अभाअद्रमुकने सर्व पोटनिवडणुकांमध्ये विजय मिळविला आहे. इतकेच नव्हे तर गेल्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या द्रमुकचा दारुण पराभव केला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयात जयललिता कायदेशीर लढाई लढत असल्याने या पोटनिवडणुकीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा